परिचय
व्यवसाय करताना चलनाच्या प्रती काढणे हा महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकाशी थेट व्यवसाय करणारे म्हणजेच बी2सी व्यवसायांना ग्राहकाबरोबर झालेल्या प्रत्येक व्यवहाराच्या चलनाची प्रत काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेगवान प्रिंटरची गरज असते आणि कमी दर्जाच्या प्रिटिंगपासून दूर राहाणेच योग्य आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रिटिंग करतेवेळी बी2सी ची देयके ही सुवाच्य आणि नीट असावीत. ग्राहक घरी गेल्यावर ती देयके टाकून देऊ शकतो.
अर्थात, दोन व्यवसायांतल्या चलनांमध्ये व्यवसायाच्या कामकाजासाठी करचलन महत्त्वाची भुमिका बजावते. GST करचलन हे उत्पादन किंवा सेवा पुरवल्याचा पुरावा असतो आणि त्याचे मूल्य चुकते करण्याची मागणी असते. ग्राहकाला चलन पाठवणे हे तुमचे ग्राहकासमवेतचे पहिले व्यावसायिक देवाणघेवाण असते. तुमच्या व्यवसायाचा ब्रांड इमेज आणि प्रतिष्ठा ही चलनाच्या स्वरूप आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. वस्तूच्या पुरवठ्यासाठी ट्रकचा वापर करत असता तेव्हा तुम्ही पाठवलेले चलन अनेक अधिकारी व्यक्तींकडून हाताळले जाणार असते.
या ब्लॉग मध्ये आपण चलन प्रिंटिंगसाठी उच्च गुणवत्तेचा प्रिंटर वापरण्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
चलनांची प्रत काढण्याची गरज आहे?
डिजीटलायझेशन करण्याचा हेतू हाताने खर्डेघाशी(पेपरवर्क) काढून टाकणे हा आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक चलन तयार करता तर त्याची प्रत काढण्याची गरज काय? व्यवसाय जर खरोखर पूर्णपणे डिजीटल झाले तर त्यांचा बराच पैसा वाचेल. चलनांची प्रत काढणे, भरणे, साठवणूक आणि सुरक्षित ठेवणे हे खूप मोठे काम आहे. प्रत काढण्याच्या खर्चाव्यतिरिक्त व्यवसायांना, छापलेली चलने ज्यामध्ये व्यवसायाविषयीची संवेदनशील व आर्थिक माहिती समाविष्ट आहे ते सुरक्षित ठेवण्याविषयीही चिंता करावी लागते.
भारत सरकारने जेव्हा जीएसटीचे नियम अद्ययावत केले आणि ई-चलन काढणे अनिवार्य केले तेव्हा, प्रत्येक करदात्याला हाच प्रश्न पडला होता की आम्हाला ई-चलनाची प्रत काढावी लागणार का? अनिवार्य गरजा पूर्ण कऱण्यासाठी व्यवसायांना ई-चलन हे एकमेव वैध करचलन आहे. ई-चलन म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन. या सर्व गोष्टींचा विचार करता ई-चलनाची प्रत काढणे ही अनुत्पादक गोष्ट वाटू शकते.
त्यामुळे ई-चलनाची प्रत काढणे गरजेचे आहे का असा विचार केला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे देता येईल. सीजीएसटीच्या नियमांपैकी नियम 138A(2) ,नुसार जेव्हा ईचलन जारी केले जाते तेव्हा एम्बेडेड आयआरएन-चलन संदर्भ क्रमांक हा क्यूआर कोडसह इलेक्ट्रॉनिकली तयार केला जातो. अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पडताळणीसाठी जेव्हा ई-चलन ची मागणी करतील तेव्हा छापील प्रत सादर कऱण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीने प्रश्न केल्यास मालाच्या पुरवठ्याच्या पडताळणीसाठी आणि प्रमाणीकरणासाठी ई-चलन सादर करता येऊ शकते.
अर्थात, प्रत्यक्षात केवळ डिजीटल स्वरूपातील ई-चलन बाळगणे हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. जेव्हा तुम्ही उत्पादन/मालाची वाहतूक करता आणि चलनाची प्रत देत नाही तेव्हा वाहातूकदाराने त्याच्या मोबाईलमध्ये डीजीटल प्रत बाळगावी अशी अपेक्षा करता. माल निरीक्षण करण्यासाठी जेव्हा वाहातूकदाराला थांबवले जाते तेव्हा वाहातूकदाराला योग्य चलन मिळवण्यासाठी त्याचा मोबाईलचा वापर केलाच पाहिजे.
त्याच्या मोबाईलची समस्या असल्यास किंवा इंटरनेट जोडणीची समस्या असेल तर वाहातूकदाराला डिजीटल चलन सादर करण्यात अडचणी येतात. शिवाय, तुमच्या मालाशी योग्य चलन जोडण्याची मानक प्रणाली त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. त्यामुळे जर तुम्ही एकावेळी एकाच वाहातूकदाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्राहकांना विविध वस्तूंचा पुरवठा करत असाल तर ही मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
अशा वेळी डिजीटल चलनापेक्षा ईचलनाची प्रत वाहातूक सुरळीत करते. मालावर तुम्ही ईडचलनाची आमि ई-वे च्या देयकाची प्रत चिकटवू शकता किंवा त्याबरोबर पाठवू शकता. जेव्हा अधिकाऱ्यांना पडताळणी कऱण्याची गरज भासेल तेव्हा, ते क्यूआर कोड स्कॅन करून मालाची पडताळणी आणि प्रमाणीकरण करू शकतात.
तुमच्याकडे ई-चलन असल्यास त्याच्या खूप प्रती काढाव्या लागत नाहीत हा त्याचा फायदा आहे. दोन व्यवसाय जेव्हा परस्परांशी व्यवहार होण्याची प्रक्रिया यामुळे जलद होते. तुम्हाला ई-चलन डिजीटली काढून तुमच्या ग्राहकाकडे पाठवणे शक्य होते. ई-चलन काढणे अनिवार्य नसले तरीही बिलिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही डिजीटल स्वरूपातील करचलन तुमच्या ग्राहकाला थेट पाठवू शकता.
वस्तू किंवा माल प्रत्यक्ष वाहातूक होणार असेल तेव्हाच करचलनाची प्रत काढण्याची गरज भासते. कोणत्याही मालवाहातूक वाहनाला अधिकारी व्यक्ती कोणत्याही क्षणी थांबवून मालाची तपासणी करू शकतात. चलनाच्या प्रती छापल्यास पुरवठा होत असलेल्या मालाची पडताळणी करण्याचा वेळ आणि त्रास वाचेल. तसेच तुमच्या ग्राहकालाही मालाची पडताळणी चटकन् करता येईल. छापील चलनामुळे प्रत्यक्ष माल पुरवठ्यासाठीचा वेळ आणि मेहनत वाचते.
निर्यातकांनी मात्र स्वच्छ आणि स्पष्टपणे छापल्या पाहिजेत कारण वस्तूंची वाहातूक इतर मालासह केली जाते. प्रत्येक विमानतळावर, चलन आणि ई-वे देयक यांच्या आधारेच मालाची पडताळणी केली जाते. त्यामुळे ग्राहकाला वेळेवर पुरवठा होण्यासाठी क्यूआर कोडसह स्पष्टपणे चलन छापील स्वरुपात काढण्याचा योग्य मार्ग शोधमे आवश्यक आहे.
करचलनासाठी उच्च गुणवत्तेच्या प्रिंटरचा वापर का?
व्यवसायांसाठी छापील स्वरुपातील ई-चलन किती अत्यावश्यक आणि महत्त्वाचे हे समजून घ्या. सरकारच्या आदेशानुसार, ज्या व्यवसायांची एकंदर वार्षिक उलाढाल पाच कोटीं असते त्यांना ई-चलन तयार कऱणे आणि जारी केले पाहिजे.
ई-चलनातील निर्णायक बाब म्हणजे क्यूआर कोड. ई-चलन हे इतर चलन आणि देयक यांच्यापेक्षा वेगळे असते ते क्यूआर कोड मुळे. हा कोड प्रत्येक ई-चलनासाठी एकमेव असतो. जेव्हा आयआरपी सिस्टिममध्ये तुम्ही चलनाचे तपशील अपलोड करता, तेव्हा सिस्टिम चलन आणि चलनाचा क्रमांक सत्यापित करते. चलनाचा नोंदणी क्रमांक म्हणजे आयआरएन आणि आयआरएन क्रमांक असलेला क्यूआर कोड तयार केला जातो. दोन्हीही प्रत्येक चलनासाठी एकमेव असतो.
फक्त दोन व्यवसायामधल्या देवाणघेवाणीतल्या चलनामध्ये क्यूआर कोड असतो ते वैध धरले जाते. ग्राहक आणि इतर भागधारकांना ते देण्यापुर्वी, तुम्हाला क्यूआर कोडसह असलेले वैध करचलन तयार करावे लागते.
चलनावर जेव्हा क्यूआर कोड असतो तेव्हा तो सहजपणे क्यूआर रीडर ला वाचण्यासाठी उपलब्ध झाला पाहिजे. अधिकाऱ्यांना गरज वाटल्यास ते क्यूआर कोडची पडताळणी करण्यासाठी क्यूआर कोड व्हेरिफायर अँप चा वापर करू शकतात. जर तुम्ही चलनाची प्रत काढणार असाल तर क्यूआर कोड योग्यपद्धतीने छापला जाईल असा उच्च दर्जाचा प्रिंटर वापरला पाहिजे. अन्यथा, तो क्यूआर कोड योग्य पद्धतीने वाचला जाऊ शकत नाही आणि सर्व पायऱ्यांचा नीट सांभाळूनही मग तुमचे ई-चलन अवैध असल्याचे दिसू शकते.
Also Read: The Impact of High-Quality Printers on Tax Invoice Printing
करचलनासाठी उच्च गुणवत्तेच्या प्रिंटरचे फायदे
ई-चलनावरील क्यूआर कोडमध्ये खालील तपशील समाविष्ट असतात:
- पुरवठादाराचा जीएसटीआय क्रमांक
- प्राप्तकर्त्याचा जीएसटीआय क्रमांक
- चलन क्रमांक
- चलन निर्मितीची माहिती
- चलनाचे मूल्य
- वस्तूंची संख्या
- मुख्य वस्तूचा एचएसएन कोड
माल/उत्पादन पडताळणीसाठी, अधिकाऱ्यांना केवळ क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. मालाच्या सर्व आवश्यक तपशीलांविषयीची माहिती क्यूआर कोड मध्ये असते. त्यामुळे वाहातूकदाराचा आणि अधिकाऱ्यांचाही मालाची पडताळणी करण्यातला वेळ वाचतो.
ग्राहकाला अचूकतेने मालाचा सुरक्षित पुरवठा करण्यात क्यूआर कोड चे महत्त्व आहे तर तो नीट छापला गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही उच्च गुणवत्तेचा प्रिंटर चलनाची प्रत छापण्यासाठी वापरला पाहिजे. चलनाची योग्य छपाई होण्यासाठी उच्च गुणवत्तेचा प्रिंटर वापरण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणेः
- सर्व आवश्यक तपशीलांसह स्पष्ट छपाई होणे सुनिश्चित करणे
- क्यूआर कोड, प्रतिमा आणि ग्राफिक्स योग्य छापले जाणे
- चलनाच्या अचूक अहवालासाठी
- उच्च गुणवत्तेच्या चलनासह व्यावसायिकता दर्शवणे
- स्वच्छ छापलेल्या चलन तपशीलांमुळे विवादाचे सहज निराकरण
- ऑडिट ट्रेल तयार करणे
- प्रिंटर बंद पडण्याच्या खर्चात बचत
Also Read: What Are The Pros And Cons Of Each Tax Invoice Printing Method?
कमी दर्जाच्या प्रिंटर वापराचे तोटे
व्यवसायामध्ये पैशांची बचत महत्त्वाची असते. पण कमी दर्जाचा प्रिंटर घेऊन त्याचा फायदा नाही. कमी दर्जाचा प्रिंटर स्वस्त असेल आणि त्यामुळे भांडवली खर्चात बचत होईल असा विचार तुम्ही कराल. पण हा निर्णय तुमच्या जीएसटी कायदा पालनापासून ते व्यवसायाच्या प्रतिष्ठेपर्यंत सगळ्यावर परिणाम करेल.
दीर्घकालीन विचार करता प्रिंटरची किंमत ही टोनरच्या किंमतीएवढी लक्षणीय नाही. प्रिंटरसह येणारी शाई किंवा टोनर लहान आकारातले असतात . त्यामुळे जेव्हा तुम्ही दैनंदिन शंभर किंवा हजार प्रती छापता तेव्हा टोनर संपणारच आणि मग नवीन खरेदीही करावा लागणार. कमी दर्जाच्या प्रिंटरमध्ये टोनरचा बेजबाबदार वापर होतो. परिणामी, टोनरचा वापर जास्त होतो. दीर्घकालीन खर्चात टोनरच्या किंमतीचा समावेश करुन विचार करता, उच्च दर्जाचे प्रिंटर हे कमी दर्जाच्या प्रिंटरपेक्षा किफायशीर ठरतात.
अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास चलन छापून सादर करता येऊ शकते. मात्र कमी दर्जाच्या प्रिंटरमुळे तपशील नीट छापले जातील असेही नाही. शिवाय, फारच कमी कालावधीत त्याची शाई फिकट होते. त्यात तुम्ही निर्यातक असाल तर मालाचा पुरवठा होण्यासाठी काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंतही लागू शकतात.
त्यामुळे कमी दर्जाचे प्रिंटर्स वापरू नयेत, कारण ग्राहकापर्यंत तुमचा माल पोहोचेल तेव्हा चलन अंधुक झाल्याने नीट दिसणार नाही.
GST ई-चलनातील क्यूआर कोड पडताळणीच्या दृष्टीने अत्यंत स्पष्टपणे छापला गेला पाहिजे. तुम्ही चलनामध्ये सर्व तपशील योग्य पद्धतीने नोंदवले असले तरीही क्यूआर कोड वाचता आला नाही किंवा रीड करता आला नाही तर तुमच्या चलनाच्या वैधतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कमी दर्जाचा प्रिंटर क्यूआर कोडच्या प्रिटिंगसाठी वापरणे आदर्श ठरू शकत नाही. तुमच्या मालाच्या किंमतीपेक्षा आणि व्यवसायाच्या प्रतिष्ठेपेक्षा प्रिंटरची किंमत खूपच कमी असते.
तुम्ही चलन कशा प्रकारे छापता त्यावरून ग्राहक तुमच्या व्यवसायाविषयी स्वतःचे मत तयार करू शकतो. जेव्हा तुम्ही कमी दर्जाचा प्रिंटर वापरता आणि रंगीत बोध प्रतिमा आणि चिन्हाशिवाय चलनाची छपाई करता तेव्हा ग्राहकाचा असा समज होऊ शकतो की व्यवसायात व्यावसायिकतेचा अभाव आहे. त्यामुळे उच्च दर्जाचा प्रिंटर वापरून चलनाची छपाई केल्यास तुमच्या ब्रांडची प्रतिष्ठेला प्रोत्साहन मिळते.
Also Read: Common Errors And Mistakes In Tax Invoices For Goods: Prevention And Correction
उच्च गुणवत्तेच्या प्रिंटर वापरण्याची योग्य पद्धत
करचलन छापण्याची गरज असेल तेव्हा उच्च दर्जाचे प्रिंटर वापरावे. महागडे प्रिंटर नेहमीच उच्च दर्जाचे असतीलच असे नाही. त्यामुळे स्वतः शोध घ्या आणि तुमच्या गरजेचा उपयोगी असा प्रिंटर शोधा. प्रिंटरची निवड आणि उच्च दर्जाच्या प्रिंटरचा उपयोग करून छपाई करण्याच्या काही उपयुक्त सूचना:
- तुमच्या छपाईच्या गरजा ओळखा
- तुम्हाला मोनोक्रोम की रंगीत प्रिंटर हवा याचा विचार करा.
- प्रिंटर घेण्यापुर्वी बहुविध पर्याय लक्षात घ्या.
- प्रति पृष्ठ छपाईच्या खर्चाची एकूण छपाई खर्चाशी तुलना करा.
- संपूर्ण कार्यालयाकरीता एकच प्रिंटर वापरायचा असेल तर वायरलेस प्रिंटरचा विचार करा
- काही चलनांची छपाई करून प्रिंटरची चाचणी घ्यावी.
- छपाईचा वेग आणि उर्जा कार्यक्षमता मोजायला हवी.
- प्रिंटर वॉरंटीसह आला आहे का याची खात्री करून घ्या.
निष्कर्ष
स्वयंचलित देयक सॉफ्टवेअरचा तुम्ही वापर करता तेव्हा चलनांची छपाई सोपी होते. आयआरपी सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर तपशील अपलोड करू शकते आणि पडताळणीनंतर आयआरपी सिस्टिम ने तयार केलेली जेएसओएन फाईल वाचून पहा. आयआरएन तयार झाल्यानंतर तुम्ही चलनामध्ये कस्टमाईजेशन चे वैशिष्ट्य आणि इतर तपशील घालू शकता. उच्च दर्जाचा प्रिंटर वापरल्याने क्यूआर कोडची छपाई योग्य पद्धतीने होण्याची खात्री असते आणि तो वाचणे किंवा रीड कऱणे आणि स्कॅन करायलाही सोपा असतो.
CaptainBiz, चा वापर करून तुम्ही करचलन काढू शकता आणि ई-चलन पोर्टलवर अपलोड करू शकता,आयआरएन आणि क्यू आर कोड तयार झाल्यानंतर ई-चलन डाऊनलोड करू शकता आणि चलनाची थेट छापील प्रत काढू शकता. हा एकीकृत मंचामुळे सर्व व्यावसायिक देवाणघेवाणी सुव्यवस्थित करण्याचा आणि GST पालनासाठी सर्व आर्थिक व्यवहार अचूकपणे नोंदवून ठेवता येतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
माल वाहातूकीसाठी ई-चलनाची प्रत छापावी लागेल का?
नाही, माल वाहातुक करताना ई-चलनाची छपाई अनिवार्य नाही. अधिकाऱ्यांना गरज असेल तेव्हा वैध चलन नोंदणी क्रमांक अर्थात आयआरएन आणि जीएसटीआ क्रमांक समाविष्ट असलेला क्यूआर कोड असलेले चलन डिजीटली सादर करता येते. अर्थात, वाहातूकदारांसाठी छापील स्वरुपातले ई-चलन सोयीचे असते कारण त्यासाठी त्यांना डीजीटल साधनाची गरज भासत नाही.
-
करचलनावर क्यूआर कोड छापणे गरजेचे आहे का?
तुमच्या व्यवसायासाठी जेव्हा ई-चलन तयार कऱण्याचे बंध असते तेव्हा क्यूआर कोडसह असलेले चलन हे वैध करचलन असते. जर GST नियमांप्रमाणे तुमच्या व्यवसायाला ते अनिवार्य नसल्यास तुम्ही आयआरपी प्रणाली वापरुन ई-चलन तयार करु शकत नाही. त्या परिस्थितीत क्यूआर कोड ची गरज नाही. करपात्र नसलेल्या मालासाठी किंवा सेवांसाठी क्यूआर कोड निर्माण करण्याची गरज नाही.
-
करचलन छापण्याची उत्तम छपाई पद्धत काय?
तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धती तुम्ही वापरू शकता. अनेक व्यवसाय त्यांच्या लेटरहेड चा वापर करून त्यावर चलनाचे तपशील छापतात. सध्या सर्वाधिक वापरात असलेली पद्धती म्हणजे जीएसटी देयक सॉफ्टवेअरमधून थेट चलनाची छपाई केली जाते. त्यामुळे वेळेआधी लेटरहेड तयार करण्याची गरज भासत नाही.
-
क्यूआर कोड नीट छापला गेला नाही तर?
असे झाल्यास अधिकारी चलनावरील क्यूआर सत्यापित करू शकत नाहीत आणि करचलन अवैध ठरते. त्यामुळे उच्च दर्जाचे प्रिंटर तुम्ही वापरले पाहिजेत आणि क्यूआर कोड सह सर्व तपशील चलनावर योग्य प्रकारे छापले जातील याची काळजी घेतली पाहिजे.
-
क्यूआर कोडचा आकार किती असावा?
GST ने क्यूआर कोड छापण्यासाठी कोणताही आकार अनिवार्य केलेला नाही. सर्वसाधारणपणे, कोणतीही अनिवार्य आवश्यकता नाही. साधारणपणे, स्पष्ट दिसण्यासाठी 3x 3-इंच आकारात क्यूआर कोडची छपाई ही आदर्श असते. क्यूआर कोडभोवती 1-इंचाची पांढरी जागा सोडली तर स्कॅनरद्वारे चांगले रीडिंग करता येते.
मात्र उच्च दर्जाच्या प्रिंटरमुळे चलनाच्या आरेखनावर आधारित 2 x 2-इंच आकारात क्यूआर कोडची छपाई होऊ शकते.
-
GST कर चलनाच्या मुद्रणाचा कायदापालनावर परिणाम होतो का?
जीएसटीच्या नियमांनुसार, छापील चलनामध्ये स्पष्ट तपशील असला पाहिजे. जेव्हा तुम्ही क्यूआर कोड सह ई-चलनाची छपाई करता तेव्हा तो पडताळणीसाठी स्पष्टपणे दिसला पाहिजे. त्यामुळे उच्च दर्जाचा प्रिंटरमुळे चलनावरील तपशीलाची छपाई स्पष्टपणे होण्याची खात्री असते. त्यामुळे व्यावसायिक प्रतिमा उंचावण्यास नक्कीच मदत होईल.
-
GST करचलनासाठी उच्च दर्जाचे प्रिंटर वापरण्याचा खर्च किती?
उच्च दर्जाचे प्रिंटर हे निश्चितच महाग असतात. त्याचा देखभाल खर्चही जास्त असला तरीही त्याचे दीर्घकालीन फायदे पाहता तो योग्य आहे. या प्रिंटरमुळे छपाई करताना कमीत कमी चुका आणि पुनर्छपाई करण्याची गरज लागत नाही. स्पष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या चलनामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा वाढण्यासही मदत होते.
-
GST करचलनाचे दृश्य परिणाम महत्त्वाचे आहे का?
उच्च गुणवत्तेच्या चलनामुळे छापील देयकाचा दृश्य परिणाम चांगला होतो. त्यामुळे व्यवसायाची प्रतिमा उंचावण्यास मदत होते आणि तुमच्या ग्राहकांना त्याचा फायदा होतो.
-
करचलनाची छपाई करताना विशिष्ट रंग लक्षात घ्यावा लागतो का?
करचलनाची छपाई करताना विशिष्ट रंग लक्षात घ्यावा लागत नाही. जीएसटीचे पालन करण्यासाठी तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या किंवा तुम्हाला हव्या त्या रंगात चलनाची छपाई करू शकता. जर चलनामध्ये बोधचिन्ह किंवा इतर रंगातील काही माहिती असेल तर चलनछपाईसाठी कलर प्रिंटर नक्कीच चांगला असतो.
-
GST कर चलनाच्या कामामध्ये प्रिंटरची निवडीचा कसा परिणाम होतो?
तुम्ही करता त्या पुरवठ्याच्या गरजेनुसार तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करचलनांची छपाई करावी लागू शकते. त्यावेळी, उच्च दर्जाच्या प्रिंटरमुळे कमीत कमी चुका होतील. तसेच थेट बिलिंग सॉफ्टवेअरमधून थेट प्रिंट देऊ शकता.