करचलन जारी करण्याची प्रक्रिया काय असते?

Home » Blogs » करचलन जारी करण्याची प्रक्रिया काय असते?

Table of Contents

ओळख

चलन म्हणजे व्यावसायिक साधन आहे जे विक्रेता खरेदीदाराला पाठवतो. यात व्यापारी पक्ष, माल, वस्तू, मूल्य, पाठवण्याची तारीख, वाहतूक साधन, सवलत आणि इतर देयरक्कम तसेच पुरवठ्याच्या अटींचा समावेश असतो. बहुतांश वेळा, चलन म्हणजे उत्पादने किंवा सेवा पुरवठ्याच्या देयरकमेच्या मागणीसाठी चलन पाठवले जाते. देयरक्कम मिळाल्यानंतर ते डॉक्युमेंट ऑफ टायटल होते. 

भारतातील जीएसटीच्या नियमांनुसार, GST कायदा 2017 च्या कलम 31 नुसार, करचलनाविषयी माहिती मिळते. ज्या विक्रेत्यांची GST करदाते म्हणून नोंदणी झाली आहे त्यांना करपात्र वस्तू आणि सेवा विक्री करण्यासाठी करचलन, पुरवठ्याचे देयक किंवा दोन्ही पाठवावे लागते. या ब्लॉगमध्ये आपण जीएसटीच्या पालनासाठी करचलन जारी करण्याची योग्य प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत.

GST करचलन उपयोजिता 

व्यावसायिकांसाठी GST करचलन लागू होते, ते गरजेचे आहे हे समजून घेतले पाहिजे. जीएसटीचे नोंदणीकृत करदाते होण्यासाठी तुमच्या व्यवसायाने किमान टप्पा गाठणे आवश्यक आहे. तो टप्पा गाठला नसेल तर तुम्हाला करचलन जारी करण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणजेच नोंदणीकृत नसलेल्या विक्रेत्यांना GST कर गोळा करता येत नाही आणि म्हणून त्यांना करचलन जारी करून GST गोळा करता कामा नये. नोंदणीकृत नसलेल्या पुरवठादारांसाठी काही विशिष्ट स्वरूपाचे करचलन नाही. तुम्हाला हवे ते स्वरूप निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. नोंदणीकृत व्यवसाय नसेल तर GST परतावा भरण्याचीही गरज नाही.

GST नोंदणी करणे उत्पादननिर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवसायांसाठी, ज्यांची उलाढाल 40 लाखापेक्षा अधिक आहे आणि सेवा क्षेत्रातल्या उद्योगांची 20 लाखांहून अधिक आहे त्यांना अनिवार्य आहे. GST कायदा विविध प्रकारची चलने आणि बिलांची व्य़ाख्या करतो. नोंदणीकृत व्यक्तीच्या श्रेणीवर कोणत्या प्रकारचे देयक जारी करायचे हे अवलंबून असते.

करपात्र वस्तू किंवा सेवा विक्री करणाऱ्या GST नोंदणीकृत पुरवठादारारला करचलन जारी करणे अनिवार्य असते. करदाता जर करमुक्त वस्तूंचा पुरवठा करत असेल किंवा कम्पोझिशन योजनेअंतर्गत नोंदणीकृत असेल तर त्यांना करचलनाऐवजी पुरवठ्याचे देयक जारी करावे लागते. चलन किंवा पुरवठ्याच्या देयकामध्ये उत्पादन, किंमत, प्रमाण, मूल्य, पुरवठादार, खरेदीदार या सर्वांचे तपशील समाविष्ट असतात आणि पुरवठ्याचे मूल्य जर रू.200 पेक्षा कमी असेल तर पुरवठा देयक किंवा चलन जारी करण्याची गरज नसते. 

Updated Banner with Shine Effect and No Hover Link Effect

GST करचलन जारी करण्याची प्रक्रिया

GST कराचे निकष लागू होणाऱ्या व्यावसायिक उद्योगांनी व्यावसायिक GST भरणे अनिवार्य आहे. GST करचलन जारी करण्याची प्रक्रियाही बरीच सुलभ आहेः 

  • सर्व करपात्र उत्पादने आणि सेवांसाठी करचलन तयार करा
  • मालाचा पुरवठा करत असाल तर, पुरवठ्या वेळी किंवा वाहातूकीसाठी माल तयार बाहेर काढताना करचलन जारी करावे
  • सेवांच्या पुरवठ्यासाठी, सेवा पुरवल्यानंतरच्या 30 दिवसांत करचलन जारी करावे.
  • बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था इत्यादींना 45 दिवसांची कालमर्यादा असते.
  • मालाचा पुरवठा करताना करचलनाच्या तीन प्रती काढाव्यात- प्राप्तकर्त्यासाठी मूळ, वाहातूकदारासाठी दुय्यम आणि पुरवठादारासाठी तिसरी प्रत असावी.
  • सेवा पुरवठ्यासाठी दोन प्रती पुरेशा असतात – प्राप्तकर्त्यासाठी मूळ प्रत आणि पुरवठादारासाठी दुय्यम प्रत
  • सवलतीच्या वस्तू किंवा सेवांसाठी किंवा कॉम्पोझिशन योजनेअंतर्गत पुरवठा करत असाल तर पुरवठा देयक जारी करावे
  • आगाऊ रक्कम मिळाली असल्यास त्यासाठी पैसे मिळाल्याची पावती द्यावी
  • आगाऊ रक्कमेसाठी तर पुरवठा झाला नसेल तर परतावा पावती द्यावी.
  • करचलनामध्ये उल्लेख केलेल्या करमूल्यापेक्षा लागू केलेला कर आणि करपात्र रक्कम जर अधिक असेल तर क्रेडिट नोट पाठवावी.
  • प्राप्तकर्त्याकडून मालाचा परतावा आला तर क्रेडिट नोट पाठवावी.
  • करचलनामध्ये उल्लेख केलेल्या करमूल्यापेक्षा लागू केलेला कर आणि करपात्र रक्कम कमी असेल तर डेबिट नोट पाठवावी.
  • रिव्हर्स चार्ज बेसिसवर व्यक्तीला कर भरायचा असेल तर पेमेंट व्हाउचर जारी करावे.
  • वाहातूकदार जे केवळ मालाची वाहातूक करतात त्यांनी करचलनाच्या सर्व तपशीलांचा समावेश असलेले वितरण चलन द्यावे.

ग्राहकांना इनपूट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यासाठी तुमच्या ग्राहकांसाठी तुम्हाला करचलन काढावे लागेल कारण तरच ते दावा करू शकतात. त्यांचे जीएसटीच्या दायित्वासाठी ते इनपूट टॅक्स क्रेडिट वापरू शकतात.

अर्थात, पुरवठ्यानंतर तीस दिवसांनी चलन दिल्यास ग्राहक आयटीसी म्हणजे इनपूट टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकत नाहीत. 

Also Read: GST Invoice Details: Essential Information

How to Issue a Tax Invoice for an Unregistered Customer? 

Many times, suppliers supply goods and services to both GST-registered and unregistered customers. Irrespective of the type of your customer, if you are a GST-registered taxpayer, you must issue a tax invoice. For supplying taxable goods, you are eligible to collect GST from the buyer. In that case, you must issue a tax invoice, which serves as proof that you have made the supply and collected the GST. In that case, you must submit the collected GST tax to the government. 

The buyer is an unregistered business, so they cannot claim Input Tax Credit (ITC). The invoice will serve as proof of transaction for them, and they must pay for the price of the goods along with the GST. Generally, the B2C invoices are comparable to suppliers supplying goods to unregistered customers. 

While issuing tax invoices for unregistered customers, you need not mention the GSTIN of the customer. You only need to mention the name and address of the recipient in your tax invoice. Even if the buyer is an unregistered customer, you must submit your invoices to the GST portal and include invoice details in GSTR 1, as you are liable to pay the collected GST.

Also Read: Invoicing Under GST

लहान व्यवसायांसाठीचे करचलन 

लहान व्यवसायांसाठी, जे GST अंतर्गत नोंदणीकृत आहेत त्यांना खालील तपशीलांसह करचलनाचा पुरवठा करावा लागतो:

• पुरवठादाराचे नाव, पत्ता आणि जीएसटीआयएन

• चलनाचा विशिष्ट अनुक्रमांक

• चलन जारी करण्याची तारीख

• प्राप्तकर्त्याचे नाव, पत्ता आणि GSTआयएन किंवा युआयएन (नोंदणीकृत असल्यास)

• प्राप्तकर्त्याचे नाव आणि पत्ता आणि वितरण पत्ता

• मालाचा एचएसएन कोड/सेवांचा अकाऊंटिग कोड

• पुरवठा केलेल्या वस्तू किंवा सेवांचे वर्णन

• प्रमाण

• एकूण मूल्य

• करपात्र मूल्य

• कराचा दर

• आकारलेल्या कराची रक्कम

Updated Banner with Shine Effect and No Hover Link Effect

• पुरवठ्याचे ठिकाण

• रिव्हर्स चार्जच्या आधारावर कर देय आहे का

• पुरवठादार किंवा त्याच्या प्रतिनिधीची डिजिटल स्वाक्षरी किंवा स्वाक्षरी

captainbiz tax invoice for small businesses

स्रोत : https://static-assets.business.amazon.com/assets/in/22nd-dec/686_Invoice_626x417.jpg.transform/width-1108/image.jpg

तुमच्या व्यवसायाची गरज असल्यास तुम्ही चलनामध्ये इतर तपशील समाविष्ट करू शकता. त्यात पुरवठा किंवा देयरक्कम अटी समाविष्ट करू शकता. उदा. तुम्ही व्यावसायिक खात्यासाठी क्यूआर कोड समाविष्ट करू शकता त्यामुळे प्राप्तकर्त्याला कोड स्कॅन करता येईल आणि तो चलनावरून देयरक्कम फेडू शकेल. तुम्ही चलनाचे वैयक्तिकरण करू शकता त्यामध्ये व्यवसायाचे नाव आणि बोधचिन्ह घालू शकता.

GST कर चलन हाताने तयार करणे हे वेळखाऊ काम असते आणि त्यात तपशीलात चूकही होऊ शकते. CaptainBiz सारख्या GST बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे ही प्रक्रिया सुलभ होते. चलनाचे तपशील कोणत्याही चुकीशिवाय  मागील माहितीवरून स्वयंचलितपणे माहिती भरली जाते. तुम्ही प्राप्तकर्त्याला डिजीटल इन्व्हॉईस पाठवू शकता त्यावर पुरवठादाराच्या स्वाक्षरीची गरज नसते. 

Also Read: How To Create A GST Invoice For An Online Business?

निर्यातकांसाठी करचलन जारी करणे

भारताबाहेरच्या ग्राहकांना तुम्ही माल पुरवठा करत असाल तेव्हा GST निर्यातक चलन जारी करणे आवश्यक आहे मात्र त्यात अतिरिक्त तपशील समाविष्ट असावा. GST नोंदणीकृत पुरवठादार भारतात आणि बाहेर देशातही पुरवठा करू शकतो. 

निर्यात चलनामध्ये खालील गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे:

  • पुरवठादाराचा नाव, पत्ता आणि जीएसटीआयएन
  • विशिष्ट चलन क्रमांक
  • चलन जारी करण्याची तारीख
  • देयरकमेसाठी देय तारीख
  • प्राप्तकर्त्याचे नाव, बिलिंग पत्ता आणि शिपिंग पत्ता
  • पुरवठ्याचे ठिकाण “भारताबाहेर” असले पाहिजे
  • निर्यातीचा प्रकार – बाँड/एलयूटी अंतर्गत निर्यात, आयजीएसटी सह निर्यात किंवा आयजीएसटी सह सेझ
  • शिपिंग देयक माहिती
  • रूपये आणि तुमच्या ग्राहकाच्या निवडलेल्या चलनामधील विनिमय दर
  • आयटम तपशील
  • प्रमाण
  • वर्णन
  • प्रत्येक आयटमसाठी कर दर
  • पुरवठादार किंवा अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी
  • बिलाचे एकूण मूल्य रूपये आणि परदेशी चलन दोन्हीमध्ये

तुम्ही करचलन फक्त रुपयांमध्ये किंवा रुपये आणि परदेशी चलनामध्ये जारी करू शकता ते तुमच्या निर्यात वाटाघाटींवर अवलंबून आहे. वर नमूद केलेला निर्यात प्रकार हा निर्यातदारांसाठी महत्त्वाच आहे. बॉन्ड/एलयुटी अंतर्गत, पुरवठादार हमीपत्र किंवा बॉन्ड अंतर्गत पुरवठा करतात आणि ते आयजीएसटी भरत नाहीत. त्यांना पुरवठ्यासाठी विकत घेतलेल्या वापर न झालेल्या सामग्रीवर आयटीसीचा दावा करू शकतात. 

आयजीएसटी सह निर्यात केल्यास निर्यातकांना GST आकारण्याची मुभा असते. ते आयजीएसटी वर परताव्याचा दावाही करू शकतात. सेझ निर्यातक हे शून्य दर पुरवठ्यामध्ये गृहित धरले जातात. अशा प्रकरणात, आयजीएसटी चा भरणा करावा लागत नाही. भारतीय निर्यातकांना सुरळीतपणे निर्यात कार्यचालन करता यावे म्हणून जीएसटीच्या कायद्यामध्ये हे बदल करण्यात आले आहेत. भारतीय निर्यातकांना प्रोत्साहन देण्यासाठी कराचा बोजा कमी करण्यात आला आहे.

captainbiz issuing tax invoices for exporters

स्रोत : https://i0.wp.com/somewisdomm.com/wp-content/uploads/2021/05/Export-Invoice-3.jpg?w=763&ssl=1

निष्कर्ष

GST नोंदणीकृत व्यवसायांनी ते योग्य प्रकारचे करचलन काढताहेत याची खात्री करण्यासाठी करचलन जारी करण्याची प्रक्रिया योग्य रीतीने जाणून घेतली पाहिजे. पुरवठ्याच्या प्रकारावर आधारित, विविध प्रकारची जीएसटी देयके तयार करता येतात.

जीएसटीच्या अनुपालनासाठी योग्य GST चलन काढण्यासाठी आधी ते माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या करचलनामध्ये अनिवार्य तपशील समाविष्ट नसेल तर ते नाकारले जाते आणि अवैध ठरेल. स्वतंत्र GST बिलिंग सॉफ्टवेअर मध्ये, GST सुरळीत भरण्यासाठी, जीएसटीचा अर्ज चलनासह स्वयंचलितपणे भरला जातो.

CaptainBiz हे स्वयंचलित GST बिलिंग सॉफ्टवेअर हे सर्व GST नोंदणीकृत व्यवसायांसाठी आदर्श सॉफ्टवेअर आहे. तुम्ही माल किंवा सेवा पुरवठा करा किंवा निर्यातक असा, तुम्ही हे सॉफ्टवेअर मधले नमुने वापरून काही मिनिटांत GST अनुरूप चलन आणि बिले तयार करण्यासाठी वापरू शकता. विशिष्ट व्यवसायाचे तपशील समाविष्ट करण्यासाठी तुमचे चलन तयार करून घ्या आणि तुमचा जीएसटीचा परतावा सुरळीतपणे भरा. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. करचलन आणि ई-चलन सारखे असते का?

तुमचा व्यवसाय जर ई-चलन तयार कऱण्याच्या गरजेची पूर्तता करत असेल तर, तुम्ही आयआरपी पोर्टलवर करचलन अपलोड करणे गरजेचे आहे आणि आयआरएन देखील काढला पाहिजे. आयआरपी प्रणाली चलन पडतळणी करणे, वैधता तपासणे, क्यूआर कोड काढणे आणि जेएसओएन फाईल बनवून देते. ही जेएसओएन फाईल तुम्ही तुमच्या बिलिंग प्रणालीमध्ये अपलोड करून ई चलन जारी करू शकता. काही अनिवार्य व्यवसायांसाठी, ई-चलन हेच वैध करचलन असते. जर तुमच्या व्यवसायासाठी ई-चलन अनिवार्य असेल तर तुम्ही आयआरएन शिवाय करचलन जारी करू शकत नाही. 

  1. सेवा पुरवठ्याआधी सेवांसाठी मी GST करचलन जारी करू शकतो का?

हो, जर सेवा पुरवत असाल तर तुम्ही सेवा पुरवठ्याआधी GST करच चलन जारी करू शकता. प्राप्तकर्त्याकडे करचलन जमा करण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवसांचा अवधी असतो. अन्यथा तुमचे ग्राहक आयटीसीचा दावा करू शकणार नाहीत.

  1. मी करचलन जारी करत नाही तेव्हा काय घडते?

तुमचा व्यवसाय GST नोंदणीकृत असेल आणि करपात्र मालाचा पुरवठा करत असता तेव्हा तुम्ही करचलन तयार करणे आवश्यक आहे. अन्यथा, ती करचोरी किंवा फसवणूक मानली जाऊ शकते. अशा प्रकऱणांमध्ये तुम्हाला दंड होऊ शकतो. कराच्या रकमेवर आणि गुन्ह्याच्या तीव्रतेच्या आधारावर तुम्हा दंड भरावा लागतो किंवा खटल्याला सामोरे जावे लागते.

  1. निर्यातीसाठी मी GST करचलन जारी करू शकतो का?

निर्यातीसाठीच्या GST करचलनाला निर्यात चलन म्हटले जाते. त्यामध्ये अतिरिक्त निर्यात तपशील समाविष्ट असतात. तेव्हाच सीमा शुल्क अधिकारी तुमचा माल निर्यातीसाठी मोकळा करतील. तुम्ही विशेषे आणि एकमेव GST निर्यात चलनावर मालाची निर्यात करू शकत नाही.

  1. GST करचलनासाठी स्वाक्षरीची आवश्यकता आहे का?

जर तुम्ही GST चलनाची छापील प्रत देणार असाल किंवा हाती लिहिलेने GST करचलन देणार असाल तर त्यावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक चलनाला डिजीटल स्वाक्षरी जोडू शकता. अर्थात, डीजीटल GST करचलन जारी करणार असाल तर स्वाक्षरी किंवा डिजीटल स्वाक्षरी ही अनिवार्य नाही. GST कायद्यानुरसार डिजीटल करचलन जारी करण्यास परवानगी असते. त्यामुळे, तुम्ही तुमच्या ग्राहकाला डिजिटल टॅक्स इनव्हॉइस ईमेलवरून पाठवण्यासाठी CaptainBiz सारखे बिलिंग साधन वापरू शकता. त्यावर सही करायची गरज नाही.

  1. करचलन काही विशिष्ट स्वरुपाचे असावे का?

जीएसटीच्या निकषांचे पालन करण्यासाठी, प्रमाणित स्वरुपातील करचलन जारी करणे आवश्यक आहे. प्रमाणित स्वरुप माहितीचे स्थान निश्चित करत नाही. त्याऐवजी, वैध करचलनामध्ये आवश्यक अशा तपशीलांची सूची असते. तरीही, तुमच्या व्यवसायांच्या गरजांनुसार तुम्हाला अनूकुल करचलन तयार करण्याची परवानगी असते. चलनामध्ये तुम्ही अधिकची माहिती देऊ शकता मात्र त्यामध्ये सर्व अनिवार्य तपशील अंतर्भूत असले पाहिजेत. 

  1. करचलनाचे स्वरुप मी मान्य केले नाही तर काय होईल?

जीएसटीच्या कायद्यानुसार काही माहिती करचलनामध्ये असणे आवश्यक आहे. जर करचलनामधली ही माहिती जसे GSTआयएल तपशील किंवा पत्त्याचे तपशील गहाळ असेल तर ते करचलन अवैध जाहीर केले जाते. जेव्हा तुमचा माल तुम्ही वाहातूक करता तेव्हा वैध करचलनाअभावी होणारी वाहातूक यासाठी अधिकारी तो जप्तही करू शकतात.

  1. माल आणि सेवांसाठी एकच करचलन जारी करू शकतो का?

हो, जर एकाच ग्राहकाला माल आणि सेवा पुरवठा करत असाल तर तुम्ही एकच करचलन दोन्ही माल आणि सेवांसाठी जारी करू शकता. जेव्हा ग्राहकाकडे वस्तूंची वाहतूक केली जाते तेव्हा तुम्हाला केवळ मालासाठीच ई-वे देयक तयार करावे लागते.

  1. निर्यातीच्या मालासाठी स्वतंत्र करचलनाची आवश्यकता असते का?

हो, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना जेव्हा तुम्ही मालाचा पुरवठा करता तेव्हा, तुम्हाला स्वतंत्र करचलन तयार करावे लागते. निर्यात करचलनामध्ये चलन विनिमय दर, वापरलेले चलन, निर्यात शुल्क यासारखे तपशील समाविष्ट असतात.

  1. माल किंवा सेवा पुरवठा कऱण्यासाठी करचलनाची इलेक्ट्रॉनिक प्रत पुरेशी आहे का?

ई-चलनाची पद्धत सुरू झाल्यापासून छापील करचलन बाळगण्याची गरज कमी झाली आहे. करचलनाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती जमा करू शकता आणि ई-चलन अधिकाऱ्यांकडे तुम्ही जमा करू शकता. तसेच ग्राहकांनाही  थेट तुमच्या GST बिलिंग सॉफ्टवेअर मधून इलेक्ट्रॉनिक चलन पाठवू शकता. तसेच, अनेक पुरवठादार, जेव्हा ते त्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी रस्ते वाहतूक कंपन्यांची मदत घेतात तेव्हा सहजसोप्या संदर्भासाठी अजूनही करचलन आणि ई-वे देयकाची छापील प्रत काढतात.

Updated Banner with Shine Effect and No Hover Link Effect
author avatar
Niharika Kapoor Content Writer
Niharika is a Freelance Content Writer and Translator with a Master of Arts in Literature. She has 5+ years of working in the same and has worked in different industries.

Leave a Reply