कर बीजकाचे (टॅक्स इनव्हॉइसचे) प्रमाणित स्वरूप काय असते?

Home » Blogs » कर बीजकाचे (टॅक्स इनव्हॉइसचे) प्रमाणित स्वरूप काय असते?

Table of Contents

प्रस्तावना

भारतातील जीएसटी-नोंदणीकृत (GST-registered) पुरवठादारांनी हे समजून घेतले पाहिजे की जीएसटी (GST) कर बीजक का महत्त्वाचे आहेत. GST कायदा करपात्र वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे अनिवार्य असते. बीजकामध्ये (इनव्हॉइसमध्ये) तुमचा GSTIN क्रमांक समाविष्ट असणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही करपात्र वस्तू आणि सेवांचा पुरवठा करता, तेव्हा तुम्हाला जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही सूट दिलेल्या वस्तूंचा पुरवठा करत असल्यास, तुम्ही पुरवठ्याचे बिल तयार करणे आवश्यक आहे. निर्यातदारांनी निर्यात केलेल्या वस्तुंसाठी कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. हे जीएसटी (GST) कर बीजकापेक्षा थोडे वेगळे आहे.

या ब्लॉगमध्ये, आपण जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) स्वरूप आणि जीएसटी मान्यतेनुरूप (GST-compliant) बीजक (इनव्हॉइस) तयार करण्याचे महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेऊ.

जीएसटी (GST) कर बीजकाच्या (टॅक्स इनव्हॉइसच्या) स्वरूपाचे महत्त्व

जीएसटी (GST) कायदा हा जीएसटी-नोंदणीकृत (GST-registered) व्यवसायांना टॅक्स इनव्हॉइससाठी स्कीम फॉलो करणे अनिवार्य करतो. तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही तुमच्या कर बीजकावर आधारित ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक आहे. आयआरपी (IRP) सिस्टम बीजक तपशील सत्यापित करते आणि QR कोड वापरून त्यांचे प्रमाणीकरण करते. तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी फक्त ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक आहे.

तुमच्या ग्राहकाला वस्तू पोहोचवण्यासाठी वाहतूक करताना, तुम्ही ई-वे बिल तयार करणे आवश्यक आहे. रस्ते अधिकारी ई-वे बिलाची पडताळणी करतील, QR कोड तपासतील आणि वस्तूंची वाहतूक करण्यास परवानगी मिळेल.

ई-इनव्हॉइस ही फक्त इनव्हॉइसची सॉफ्ट कॉपी नसते. जेव्हा तुमचा व्यवसाय ई-इनव्हॉइसिंगची आवश्यकता पूर्ण करतो, तेव्हा ई-इनव्हॉइस हे एकमेव वैध कर बीजक असते. तुमच्या व्यवसायासाठी ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक नसल्यास, तुम्ही नियमित कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) देऊ शकता.

जे कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) टेम्पलेटचे अनुसरण करत नाही त्याचे कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे शक्य आहे. तुम्ही अशा करबीजकांद्वारे (इनव्हॉइसद्वारे) वस्तूंचा पुरवठा करू शकत असताना, तुमचे रिटर्न भरण्यासाठी तुम्ही नेहमी जीएसटी (GST) पोर्टलवर जीएसटी (GST) इनव्हॉइस सबमिट करणे आवश्यक आहे. त्यामुळे, जीएसटी-मान्यतेनुसार (GST-compliant) कर बीजके (टॅक्स इनव्हॉइसेस) तयार करणे केव्हाही उत्तम आहे. हे आपली व्यावसायिक प्रतिष्ठा देखील वाढवेल, विश्वास निर्माण करेल आणि ग्राहक संबंध सुधारेल.

Also Read: The Importance Of Issuing Tax Invoices In A Timely Manner

कर बीजकाच्या (टॅक्स इनव्हॉइसच्या) स्वरूपाद्वारे व्यवसायांना होणारा फायदा

कर बीजकाच्या (टॅक्स इनव्हॉइसच्या) स्वरूपाचे पालन करणे म्हणजे जीएसटी-मान्यता (GST-compliance) सुनिश्चित करण्याचा एक त्रास-मुक्त मार्ग आहे. जेव्हा तेथे टेम्पलेट असेल, तेव्हा तुम्हाला सर्व अनिवार्य तपशील प्रविष्ट करण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. टेम्पलेटमध्ये अनिवार्य फील्ड स्वयंचलितपणे समाविष्ट होतील. आपण योग्य फील्डमध्ये तपशील प्रविष्ट करणे लक्षात ठेवले पाहिजे.

प्रमाणित बीजक स्वरूप राखल्याने तुमच्या ग्राहकांनाही फायदा होईल. ते त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये बीजक (इनव्हॉइस) आयात करू शकतात आणि जीएसटी (GST) रिपोर्ट त्वरित तयार करू शकतात. हे जीएसटी-मान्यता (GST-compliant) व्यवसाय म्हणून तुमची ब्रँड प्रतिष्ठा देखील स्थापित करेल.

जेव्हा तुमच्याकडे आधीपासून योग्य स्वरूपामध्ये बीजक असेल तेव्हा तुमचे बीजक (इनव्हॉइस) ई-इनव्हॉइसिंग आणि जीएसटी (GST) पोर्टलसोबत एकत्रित करणे सोपे होते. अन्यथा, तुमचे बीजक (इनव्हॉइस) हे मान्यतेच्या बीजक स्वरुपात (कंप्लायंट इनव्हॉइसमध्ये) रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ आणि संसाधने खर्च करणे आवश्यक आहे. 

तुम्ही जीएसटी (GST) नियमांचे पालन करत आहात याची खात्री करण्यासाठी, बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर करा जे जीएसटी (GST-compliant) मान्यतेनुसार बीजके (इनव्हॉइसेस) तयार करते. जेव्हा तुम्ही ऑटोमेशन टूल वापरता तेव्हा तुम्ही अनिवार्य फील्डचे तपशील प्रविष्ट करणे ते कधीही चुकवणार नाही. तसेच, हे कष्टदायक काम कमी करते आणि मानवी त्रुटी टाळल्या जातात.

Also Read: Importance And Benefits Of GST Tax Invoice For Small Businesses

कर बीजकाची (टॅक्स इनव्हॉइसची) लहान व्यवसायांसाठी असलेली गरज

करपात्र वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणार्‍या लहान व्यवसायांनी नेहमी जीएसटी मान्यतेनुसार (GST-compliant) बीजके (इनव्हॉइसेस) तयार केले पाहिजेत. ही बीजके (इनव्हॉइसेस) जीएसटी पोर्टलवर डिजिटली अपलोड केले जाणे आवश्यक आहे. अधिकारी बीजकांची पडताळणी करतील आणि विसंगती ओळखतील. अपलोड केलेली बीजके (इनव्हॉइसेस) निर्धारित स्कीमाचे पालन करत नसल्यास, ते नाकारले जातील. त्यामुळे जीएसटी (GST) रिटर्न भरताना गोंधळ होऊ शकतो. लहान व्यवसायांसाठी कर बीजकांमध्ये (टॅक्स इनव्हॉइसेसमध्ये) समाविष्ट करणे आवश्यक असलेली अनिवार्य फील्ड आहे:

  • एकमेव बीजक क्रमांक (युनिक इनव्हॉइस नंबर) आणि तारीख
  • ग्राहकाचे नाव आणि पत्ता
  • पुरवठादाराचे नाव आणि पत्ता
  • शिपिंग आणि बिलिंगचा पत्ता
  • पुरवठादार आणि ग्राहकाचा जीएसटीआयएन (GSTIN)  क्रमांक
  • पुरवठा करण्याचे ठिकाण
  • वस्तूंचा (मालाचा) HSN कोड 
  • वस्तूंचे (मालाचे) तपशील आणि वर्णन
  • किमतीचे तपशील
  • वस्तूंचे (मालाचे) एकूण करपात्र मूल्य
  • सवलत (सूट)
  • दर आणि करांची रक्कम 
  • कराचा (टॅक्सचा) प्रकार
  • रिव्हर्स चार्ज लागू
  • पुरवठादाराची स्वाक्षरी

तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कर बीजक तयार केल्यास, पुरवठादाराची स्वाक्षरी अनावश्यक असते. जेव्हा प्राप्तकर्ता नोंदणीकृत नसतो आणि वस्तूंचे मूल्य 50,000 पेक्षा जास्त असते, तेव्हा पुरवठादाराने जीएसटी- मान्यतेनुसार (GST-compliant) बीजक प्रदान करणे आवश्यक असते  ज्यामध्ये खालील अनिवार्य फील्ड समाविष्ट असणे आवश्यक आहे:

  • ग्राहकाचे नाव आणि पत्ता
  • वितरणाचा (डिलिव्हरीचा) पत्ता
  • राज्याचे नाव आणि कोड

Also Read: The Importance Of Including All Required Elements On A Tax Invoice

निर्यातदारांसाठी कर बीजकाची (टॅक्स इनव्हॉइसची) आवश्यकता

निर्यातदारांनी निर्यातीच्या व्यवहारासाठी कर बीजक तयार करणे आवश्यक आहे. या बीजकात निर्यात आणि आयातदार देय रक्कम भरू शकतो याबद्दल तपशील समाविष्टीत आहे. हे नियमित जीएसटी (GST) बीजकासारखेच (इनव्हॉइससारखेच) आहे. याशिवाय, काही महत्त्वाचे फरक आहेत.

निर्यातदार आयजीएसटीद्वारे (IGST) किंवा त्याशिवाय वस्तूंचा पुरवठा करू शकतात. बाँड/LUT अंतर्गत निर्यात निर्यातदारांना आयजीएसटी (IGST) न भरता निर्यात करण्यास अनुमती देते. आयजीएसटी (IGST) शिवाय निर्यात करण्यासाठी तुम्ही लेटर ऑफ अंडरटेकिंग LUT दाखल करणे आवश्यक आहे. हे GST RFD 11 नुसार सुसज्ज करणे आवश्यक आहे.

आयजीएसटी (IGST) भरल्यानंतर निर्यातदारही निर्यात करू शकतात. त्याचा नंतर परताव्यासाठी दावा केला जाऊ शकतो. जर निर्यातदाराने ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) चा वापर केला नसेल, तर परताव्याचा दावा केला जाऊ शकतो. जेव्हा ते SEZ युनिट्समध्ये निर्यात करतात तेव्हा ते परताव्याचा दावा देखील करू शकतात. SEZ ला वस्तूंचा पुरवठा करणे हा शून्य-रेट असलेला पुरवठा मानला जातो. निर्यातीला चालना देण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.

निर्यात बीजकामध्ये (इनव्हॉइसमध्ये) अनिवार्य फील्ड समाविष्ट करणे आवश्यक आहे:

  • निर्यातदाराचा जीएसटीआयएन (GSTIN)
  • बीजक क्रमांक (इनव्हॉइस नंबर) आणि तारीख
  • निर्यातदाराचे नाव आणि पत्ता
  • प्राप्तकर्त्याचे नाव आणि पत्ता
  • शिपिंग आणि बिलिंगचा पत्ता
  • बीजक (इनव्हॉइस) तयार करण्याची तारीख
  • देय तारीख
  • INR ते योग्य चलनात रूपांतरण दर
  • एकूण बीजक (इनव्हॉइस) मूल्य
  • शिपिंग बिलाचा तपशील
  • निर्यातीचा प्रकार
  • अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी
  • नोट्स (सुचना)

कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) टेम्पलेट म्हणजे काय? 

तयार केलेल्या प्रत्येक जीएसटी (GST) कर बीजकाने (टॅक्स इनव्हॉइसने) जीएसटी (GST) कायद्याने विहित केलेल्या स्कीम किंवा मान्यतेचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुमचे इनव्हॉइस निर्दिष्ट स्वरूपामध्ये तयार केलेले नसेल, तर ते अवैध मानले जाईल. जीएसटी (GST) पोर्टल अशी बीजके नाकारू शकते. तसे झाल्यास, त्याचा परिणाम पुरवठादार आणि ग्राहक दोघांसाठीही गैर-अनुपालनात होऊ शकतो.

जर जीएसटी (GST) बीजक प्राप्त झाल्यानंतरच प्राप्तकर्ता फक्त ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) चा दावा करू शकतो. जर त्यांना ई-इनव्हॉइसिंगची आवश्यकता देखील विस्तृत आहे आणि लवकरच सर्व व्यवसायांना ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक असेल. बीजक तपशील जीएसटी (GST) फॉर्ममध्ये स्वयंचलितपणे भरलेले असतात, त्यामुळे अचूकता महत्त्वाची आहे.

कर बीजकाचे (टॅक्स इनव्हॉइसचे) स्वरूप खालीलप्रकारे आहे:

captainbiz कर बीजकाचे टॅक्स इनव्हॉइसचे स्वरूप

Source

निर्यात बीजकाचे (इनव्हॉइसचे) स्वरूप खालीलप्रकारे आहे:

captainbiz निर्यात बीजकाचे इनव्हॉइसचे स्वरूप

Source

जीएसटी (GST) मान्यतेसाठी जीएसटी (GST) बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर

लहान व्यवसाय मालकांसाठी हाताने GST बीजके (इनव्हॉइसेस) तयार करणे सोपे नाही. ऑटोमेटेड जीएसटी (GST) बिलिंग सॉफ्टवेअर जीएसटी (GST) बिल निर्मितीसाठी एक अखंड प्रक्रिया तयार करते. जीएसटी (GST) इनव्हॉइस (बीजके) स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी तुम्ही CaptainBiz सारखे साधन वापरू शकता.

captainbiz जीएसटी gst मान्यतेसाठी जीएसटी gst बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर

CaptainBiz वापरून, तुम्ही नेहमी जीएसटी-मान्यतेनुसार (GST-compliant) बीजके (इनव्हॉइसेस)आणि बिले तयार करू शकता. कर बीजकांमध्ये (टॅक्स इनव्हॉइसमध्ये) सर्व अनिवार्य फील्ड समाविष्ट करण्यासाठी हे टूल जीएसटी (GST) टेम्पलेटसह प्रीलोड केलेले आहे. कस्टमाइज बीजके तयार करण्यासाठी तुमच्या व्यवसायाचे नाव आणि लोगो जोडण्यासाठी हे टेम्पलेट देखील कस्टमाइज करण्यायोग्य आहेत. एकदा तुम्ही मास्टर्स अपडेट केल्यानंतर, बीजक (इनव्हॉइस) तपशील देखील रिअल टाइममध्ये ऑटो-पॉप्युलेट केले जातात. हे बीजक (इनव्हॉइस) निर्मिती दरम्यान त्रुटींची शक्यता दूर करते. 

ई-इनव्हॉइसिंग सिस्टमसह एकत्रीकृत केल्याने तुम्हाला CaptainBiz इनव्हॉइसेसचा वापर करून त्वरित ई-इनव्हॉइस तयार करण्याची परवानगी मिळते. जीएसटी (GST) फॉर्म हे ऑटो-पॉप्युलेट केलेले आहेत आणि ते जीएसटी (GST) पोर्टलवर सहज अपलोड केले जाऊ शकतात. हे एक असे टूल आहे जे ऑटोमेटेड टूल जीएसटी (GST) रिटर्न भरणे सुव्यवस्थित करते, आर्थिक व्यव्हार तपासणी राखते आणि संपूर्ण जीएसटी-मान्यता (GST-compliance) सुनिश्चित करते.

निष्कर्षः

व्यवसायांद्वारे जीएसटी (GST) कायद्याचे पालन करत राहण्यासाठी अचूक आणि मान्यतेनुसार जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही नेहमी वैध कर बीजके (टॅक्स इनव्हॉइ्सेस) तयार करत आहात याची खात्री करण्यासाठी कर बीजकांचे (टॅक्स इनव्हॉइसेसचे) स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. जीएसटी पोर्टलवर बीजक (इनव्हॉइस) अपलोड करण्यापूर्वी, बीजके  आणि तपशील दोनदा तपासा. बीजके दुरुस्त करणे किंवा रद्द करण्यापेक्षा योग्य तपशीलांसह बीजके तयार करणे सोपे आहे. तसेच, अचूक बीजक तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यास आणि दंडाशिवाय जीएसटी (GST) दायित्वे भरण्यास मदत करेल.

CaptainBiz हे भारताचे उच्च-रेट केलेले ऑटोमेटेड जीएसटी GST बिलिंग सॉफ्टवेअर आहे. या क्लाउड-आधारित साधनाचा वापर करून, तुम्ही जीएसटी-मान्यतेनुसार (GST-compliant) बीजके आणि बिले तयार करू शकता. अचूकता आणि संमती सुनिश्चित करण्यासाठी तपशील मास्टर्सकडून ऑटो-पॉप्युलेट केले जातात. हे टूल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि रिकॉन्सिलिएशन मॉड्युल्ससह देखील येते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवहारांचे सहजतेने निरीक्षण करता येते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) टेम्पलेटचे पालन करणे अनिवार्य आहे का?

होय, तुमचा व्यवसाय जीएसटी-नोंदणीकृत (GST-registered) असल्यास, तुम्ही सर्व अनिवार्य फील्डसह जीएसटी-मान्यतेनुसार (GST-compliant) कर बीजक तयार केले पाहिजे. कर बीजकामध्ये (इनव्हॉइसमध्ये) सर्व आवश्यक फील्ड असणे आवश्यक आहे. अन्यथा, ते अवैध मानले जाईल.

  1. बीजक (इनव्हॉइस) तारीख आणि देय तारखेमध्ये काय फरक आहे?

बीजकाची (इनव्हॉइसची) तारीख ही बीजक (इन्व्हॉइस) तयार केलेली तारीख असते. पुरवठादारांनी पुरवठ्याच्या वेळी किंवा वितरणासाठी (डिलिव्हरीसाठी) त्यांच्या गोदामांमधून माल (वस्तू) काढण्यापूर्वी कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. ते पुरवठा तारखेपूर्वी कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) देखील तयार करू शकतात. देय तारीख म्हणजे ज्या तारखेला देय देणे आहे. प्राप्तकर्त्याने देय तारखेच्या आत बीजक भरणे अपेक्षित आहे.

  1. कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करण्यासाठी वेळ मर्यादा काय आहे?

वस्तूंच्या पुरवठ्यासाठी, पुरवठ्याच्या वेळी किंवा गोदामातून माल काढण्यापूर्वी कर बीजक तयार करणे आवश्यक आहे. सेवांच्या पुरवठ्यासाठी, सेवा पुरवल्यापासून 30 दिवसांच्या आत कर बीजक तयार करणे आवश्यक आहे. पुरवठादार आगाऊ कर बीजके तयार आणि जारी करू शकतात. जेव्हा कर कालावधी दरम्यान बीजक तयार केले जाते, तेव्हा प्राप्तकर्त्याने बीजक भरले आहे की नाही याची पर्वा न करता जीएसटी (GST) कर भरणे आवश्यक आहे.

  1. जर 30 दिवसांच्या कालावधीनंतर जीएसटी (GST) बीजक जारी केल्यास काय होईल?

पुरवठादाराने 30 दिवसांच्या पुरवठ्यानंतर कर बीजक जारी केल्यास, त्यांनी या कालावधीत जीएसटी (GST) कर भरणे आवश्यक आहे. तथापि, प्राप्तकर्ता 30 दिवसांपेक्षा जुन्या पुरवठादारांशी संबंधित असलेल्या बीजकासाठी (इनव्हॉइससाठी) ITC चा दावा करू शकत नाही. त्यामुळे, पुरवठादार आणि खरेदीदार यांच्यातील व्यावसायिक संबंधांवर त्याचा परिणाम होईल.

  1. जीएसटी (GST) स्वरूपाचे पालन न केल्यास काय होईल?

जीएसटी (GST) पोर्टलसाठी व्यवसायांनी स्कीमनुसार बीजके (इनव्हॉइसेस) अपलोड करणे आवश्यक आहे. बीजक (इनव्हॉइस) योग्य स्वरूपात अपलोड न केल्यास, ते नाकारले जाईल आणि अवैध मानले जाईल. याचा अर्थ पुरवठादाराला सुधारणा कराव्या लागतील किंवा बीजक (इनव्हॉइस) रद्द करावे लागेल. त्यांनी स्वरूपानुसार नवीन बीजके (इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम प्राप्तकर्त्याच्या जीएसटी फॉर्मवरही होईल. बीजके (इनव्हॉइसेस) दुरुस्त करणे आणि जीएसटी (GST) दायित्वे समायोजित करणे हे योग्य स्वरूपात बीजके तयार करण्यापेक्षा अधिक क्लिष्ट आहे.

author avatar
Niharika Kapoor Content Writer
Niharika is a Freelance Content Writer and Translator with a Master of Arts in Literature. She has 5+ years of working in the same and has worked in different industries.

Leave a Reply